
वाळूजमहानगर – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद, यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या हॉकी स्पर्धेमध्ये बजाजनगर येथील युरेका इन्फोसिस स्कूलने हॅप इंटरनॅशनल स्कूलचा 2-0 पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला.
खुला गटासाठी झालेली ही स्पर्धा क्रीडा संकुल, गारखेडा औरंगाबाद येथे संपन्न झाली. या स्पर्धेसाठी, युरेका इन्फोसिस स्कूलचे क्रीडाशिक्षक समीर शेख, शुभांगी शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल स्कूलचे संस्थाचालक गौतम चोपडा, परशुराम सावळे, अनिल पाडळकर, प्रा. सुनील पाडळकर, प्रा. सचिन घुगे, गौरव लोढा तसेच स्कूलचे मुख्याध्यापक, समन्वयक व शिक्षक यांनी संघाचे अभिनंदन केले. यापूर्वीही स्कूलच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
