March 27, 2026

वाळूजमहानगर, ता.3 – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रकी विद्यालयातून सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महात्या केल्याची घटना 2 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

रोहन राजेश सवडे (वय, 18 रा. चांगेफळ, ता सिंदखेडराजा जि. बुलढाणा हा अभियांत्रकीचे शिक्षण घेण्यासाठी बजाजनगरात आला होता. याठिकाणी तो आणि त्याचे दोन क्लासमेंट जागृत हनुमान मंदीर परिसरातील धनश्री कॉलनीमध्ये भाड्याने खोली घेऊन राहत होते. घटनेच्या वेळी रूम पार्टनर वैभव इंगळे व शिवम आघाव हे दोघेजन बाहेर गेले होते. बाहेरील काम आटोपून रूमवर आल्यानंतर त्यांना रोहन फॅनला दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धावस्थेत घाटी रूग्णालयात दाखल केलेल्या रोहनला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
चौकट— विषय गेल्याने घेतले टोकाचे पाऊल
शेती करून दोघा भावांचे शिक्षण करणाऱ्या वडीलांचे परिश्रम बघून रोहन खजील होत होता. त्यातच मागील सेमीस्टरमध्ये त्याचे काही विषय गेल्याने तो सतत टेन्शनमध्ये होता. त्यातूनच त्याने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा टोकाचा निर्यण घेतला असावा. अशी शंका त्याच्या मित्रांनी वर्तवली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *