February 4, 2026


वाळूज महानगर, (ता.17) – कंपनीतील 20 वर्षीय कामगार तरुणीसोबत बळजबरीने कु कृत्य करून लग्नाची गळ घातली. मात्र तिने नकार देताच दोघांचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी सुपरवायझर असलेल्या 24 वर्षीय तरुणाने दिली. वाळुज परिसरातील रांजणगाव ()शेणपुंजी) येथे घडलेली ही घटना शुक्रवारी 16 जानेवारी रोजी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यवतमाळ येथील एका 20 वर्षीय तरुणीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती डिसेंबर 2023 मध्ये वाळूज परिसरात आली. ती वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत प्रक्षिणार्थी म्हणून काम करत होती. त्यावेळी कंपनीतील सुपरवायझर नितिन ज्ञानेश्वर पायगव्हाण वय 24 रा. शिवनेरी कॉलनी रांजणगाव (शेणपुंजी) याच्यासोबत तिची ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये नितिन याने तीला त्याच्या राहत्या घरी राहण्यास नेले. ती खोलीत एकटी असताना नितीन पाय गव्हाण याने तिच्या मनाविरूध्द अनेक वेळा कु कृत्य (शारीरिक संबंध) केले. नितिन हा दारू पिऊन तिच्या खोलीत येऊन मारहाण करून कु कृत्य करत होता. दरम्यान त्याने केला लग्नाची गळ घातली. मात्र तिने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर 31 जुलै ते 2 आगस्ट यादरम्यान नितीन हा तिला खोलीत बंद करून बाहेरून कुलूप लावून जात होता. 3 आगस्ट रोजी चुकून खोलीचा दरवाजा उघडा राहिल्याने ती त्याच्या तावडीतून सुटून यवतमाळ येथे मुळगावी पळून गेली. त्यानंतर नितीन सतत तिला फोन करून परत ये, लग्न कर नाहीतर तुझ्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करीन.अशी धमकी दिली.

त्याचा त्रास वाढत गेल्याने या त्रासाला कंटाळून तिने मोबाईल बंद केला. मात्र नितिन हा तिच्या वडील व भावाच्या मोबाईलवर फोन करून लग्न केले नाही, तर जीवे मारीन अशी धमकी दिली. डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2026 दरम्यान घडलेल्या या प्रकारा मुळे त्रस्त झालेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार करत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *