March 24, 2026


वाळुज महानगर (ता.12) – बजाजनगर येथून रांजणगावकडे जाणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून घेऊन जाताना तिने मदतीसाठी आरडा ओरड केली. हा प्रकार काही दक्ष नागरिकांच्या लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ रिक्षा अडवून चालकाला बेदम चोप दिला. या घटनेत मुलगी सुखरूप असून आरोपी फरार झाला आहे. हा सिनेस्टाईल प्रकार वाळूज औद्योगिक वसाहतीत बुधवारी (ता.12) रोजी 11 वाजेच्या सुमारास घडला.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील भिंगी बोरसर येथील 17 वर्षीय मुलगी वाळुज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे राहते. बुधवारी (ता.12) रोजी 11 वाजेच्या सुमारास पीडित मुलगी बजाजनगर येथील स्टरलाइट कंपनी समोरून रांजणगाव येथे जाण्यासाठी रिक्षा (एम एच 20, ईएफ-5541) मध्ये बसली. ती ज्यावेळी रिक्षात बसली त्यावेळी रिक्षात अन्य कोणीही प्रवासी नव्हते. पीडित मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी रिक्षा चालकाने ही रिक्षा भरधाव वेगात चालवून जोगेश्वरीकडे नेली. यावेळी पीडित मुलीने त्याला थांब, थांब असे सांगूनही तो रिक्षा भरधाव चालवतच राहिला. त्यामुळे पिढीत मुलीने मदतीसाठी आरडा ओरड केली. दरम्यान रस्त्यातीलच एका कंपनीसमोर काही कामगार उभे होते. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच त्यांनी मदतीसाठी धावपळ करत रिक्षा अडवली. तिने सांगितलेल्या आपबितीचा प्रकार भयानक असल्याचे लक्षात येताच त्यांनी रिक्षा चालकाला बेदम मारहाण करून चोप दिला.

 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच (112) पोलीस व्हॅन घटनास्थळी आली. मात्र तोपर्यंत आरोपी रिक्षा सोडून फरार झाला होता. पीडित मुलीला पोलिसांनी मदतीचा हात देत रिक्षा ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. चित्रपटाच्या कथानकाला साजेशा या घटनेमुळे वाळूज औद्योगिक परिसरात अत्यंत खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *