March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.10) – वाळुज जवळील नायगाव बकवालनगर येथील कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची अज्ञात शिवभक्तांनी स्थापना केली. हा प्रकार सोमवारी (ता.10 रोजी ) सकाळी उघडकीस आला. 

 

वाळूज जवळील छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्ग असलेल्या गरवारे कंपनीसमोर बकवालनगर – नायगाव ही नागरी वसाहत आहे. जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या या वसाहतीच्या प्रवेशद्वारावर ग्राम पंचायतने भव्य स्वागत कमान उभारलेली आहे.

अज्ञात शिवसैनिकांनी या कमानी मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसविली असल्याचे सोमवारी (ता.10) रोजी सकाळी उघडकीस आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथे शंभर ते दीडशे नागरिक जमा झाले असून खबरदारी म्हणून पोलीस प्रशासक देखील सज्ज आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *