March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.8) – श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ संचलित डॉ. वेदप्रकाश पाटील फार्मसी कॉलेज, छ. संभाजीनगर येथे बी. फार्मसी व एम फार्मसी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारासाठी स्काय बायोटेक लाईफ सायन्सेस लिमिटेड, छ. संभाजीनगर यांच्या सयुक्त विद्यमाने औषधनिर्माण कंपनीतील क्वालिटी कंटोल, क्वालिटी आशुरन्स प्रोडक्शन अशा विविध विभागातील रिक्त जागें करिता 5 एप्रिल 2023 रोजी श्रीधनेश्वरी शैक्षणिक संकुलात मुलाखती घेण्यात आल्या.

मुलाखती स्काय बायोटेक लाईफ सायन्सेस लिमिटेड, छ. संभाजीनगर येथील प्ल्यांट हेड सुरेंद्र शेटटी क्वालिटी आशुरन्स व्यवस्थापक, रामदास एस. कलासरे, मानव संसाधन व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी घेतल्या. या मुलाखतीस मोठ्या संख्येने उमेदवारांनी सहभाग नोंदवला.

यासाठी श्री धनेश्वरी शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष मा. डॉ. वेदप्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डॉ. उदयसिंह पाटील यांनी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच महाविद्यालया तर्फे या मुलाखतीसाठी काळेगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी मुलाखती यशस्वी रित्या पार पाडण्यास सहकार्य लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *