February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.5) – अज्ञात चार आरोपींनी अंदाजे 30 वर्षीय इसमाला मारहाण करून चाकूने भोसकून त्याचा खून केला. ही घटना पंढरपूर ते एस क्लब चौक दरम्यान अब्बास ट्रान्सपोर्ट समोर रविवारी रात्री 10:40 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान मयताची ओळख पटली. मात्र हा खून कोणी आणि कशासाठी केला याचे गुण मात्र अद्यापही उलगडले नाही.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस अंमलदार शेख युनिस, सय्यद चांद हे रविवारी 4 जानेवारी रोजी कमळापुर येथील तब्लीगी इज्तेमा बंदोबस्त करून खाजगी चारचाकी वाहनाने साध्या गणवेशात घरी जात असतांना अब्बास पेट्रोलपंपासमोर तिसगाव शिवार येथे अंदाजे 10:40 वाजेच्या सुमारास रोडच्या लगत तिन ते चार अनोळखी तरुण मुले एका अनोळखी इसमास मारहाण करत असल्याचे दिसले. त्यामुळे सय्यद चांद वाहन हे रोडच्या बाजुला थांबले असता, त्या ठिकाणी दोन दुचाकी दिसल्या. तसेच एक अनोळखी इसम त्या ठिकाणी बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसला. तेव्हा सय्यद चांद यांनी तुम्ही त्या व्यक्तीला मारहाण का करताय असे विचारताच काही एक न सांगता ते पळुन गेले. जखमी अनोळखी इसम हा बेशुध्द झाल्याने तात्काळ पोलिसांना माहीती दिली. तसेच अनोळखी इसमाजवळ जाऊन त्यास पाहत असतांना अब्बास पेट्रोलपंप (एच.पी. पेट्रोलपंप) येथे काम करणारे शुभम जायभाय, मिरान शेख आले. त्यांनी सुध्दा ही घटना पाहीली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक विनोद अबुज, व पोलीस स्टॉफ घटनास्थळी आले. त्यांनी तात्काळ जखमी बेशुध्द अनोळखी इसमास घाटीत उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासुन मयत घोषित केले.
याप्रकरणी पोलीस अंमलदार सय्यद चांद सय्यद गुलाब यांच्या फिर्यादीवरून फरार झालेल्या चार अज्ञाता विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

               फोटोवरून पटली ओळख –
दरम्यान या अनोळखी मयत तरुणांचे फोटो वाळुज एमआयडीसी पोलिसांनी सोशल मीडियावर टाकले. हे फोटो नायगाव बकवालनगर येथील जोगेश्वरीचे सरपंच रमेश आरगडे यांनी ओळखले. त्यानंतर त्यांनी वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना त्या मयत तरुणांविषयी माहिती दिली. अमोल एकनाथ बारे रा. नायगाव -बकवालनगर असे त्या मयताचे नाव असून तो शेत मजुरीचे काम करत होता. अशी माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नरेश ठाकरे यांनी दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *