February 5, 2026

वाळुज महानगर – गरवारे मैदानावर सुरू असलेल्या 17 व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट फ्रान्सिस हायस्कूलने स.भु. हायस्कूलचा 7 गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात ऐंजल किड्सने पोदार हायस्कूलचा 42 धावांनी पराभव केला.
पहिल्या सामन्यात स.भु.हायस्कूलने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत 20 षटकांत 8 गडी बाद 137 धावा केल्या. यात शाम कोर्वीने 9 चौकारासह 55, सुमित चित्रकने 10 धावा केल्या. मात्र इतर फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. सेंट फ्रान्सिसतर्फे कृष्णा, ऋषिकेश डोंगरे यांनी प्रत्येकी 2 तर आदित्य सुरडकर, पीयूष चौधरी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरात एसएफएसने विजयी लक्ष्य 16.3 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात साध्य केले. यात सामनावीर ऋषिकेश डोंगरेने 37 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारांसह 79, अभिषेक पवारने नाबाद 26 धावा केल्या. स.भु.हायस्कूलतर्फे अविष्कार पवार, सोहम कोर्वी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात ऐंजल किड्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकांत 8 गडी बाद 182 धावा केल्या. यात सामनावीर वेद शर्माने 9 चौकार व 2 षटकारांसह 57 चेंडूंत 83, निखिल जांगिडने 24, आदित्य राठोडने 13 धावा केल्या. पोदार स्कूलतर्फे संग्राम मोरेने 3, प्रथमेष भुके याने 2, सद्गुरु रेड्डी व नर्णव कदम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरात पोदार इंटरनॅशनल हायस्कूलचा संघ षटकांत 7 गडी बाद 140 धावाच करू शकला. यात जय जाधवने निर्धाराने किल्ला लढवत 48 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकारांसह 79, सद्गुरु रेड्डीने 18 धावा केल्या. इतर फलंदाज मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. ऐंजल किड्सतर्फे वेद शर्माने 4, हर्षद शेणॉय, अभिराम गोसावी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *