February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.15) – वाळूज येथे करण्यात आलेले ड्रेनेज लाईनचे काम अभियंत्याच्या मर्जीनुसार करण्यात आल्याने या ड्रेनेचा फायदा होण्याऐवजी नागरिकांना तोटाच होत आहे. परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे हे चुकीचे काम करणाऱ्या अभियंत्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

वाळूज मधील भगतसिंगनगर, विजयनगर मधील ड्रेनेजचे काम वर्ष 2019 मध्ये नागरिकांच्या आंदोलनामुळे करण्यात आले. हे काम करीत असताना बहूतांश गल्ल्यांमध्ये हेतुपूरस्पर ड्रेनेचचा उतार हा नैसर्गिक उताराच्या विरुद्ध काढण्यात आला. यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी काम करत असलेल्या अभियंत्याच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन कामास विरोध ही केला. त्यावेळी अभियंता व त्यासोबत असलेल्या व्यक्तींनी अभियंता मी आहे का तुम्ही ? असा सवाल उपस्थित करून जे काम होत आहे, ते बरोबर होत आहे. असे म्हणून हेतुपूरस्पर चुकीचे काम केले. त्यानंतर वेळोवेळी ड्रेनेज ब्लॉक होऊन पावसाळ्यात तर अक्षरशः नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे घाण पाणी गेले. यासंदर्भात ग्रामपंचायतला वेळोवेळी निवेदन ही देण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत तर्फे वेळोवेळी कामधकावू काम करण्यात आले. यामुळे अद्यापही या ड्रेनेजच्या त्रासापासून नागरिकांची मुक्तता झाली नाही. उलट घाणीच्या पाण्यामुळे येथे वेळोवेळी साथीचे आजार पसरत असतात. तसेच याच गल्लीच्या बाजूला मुस्लिम धर्मियांचे प्रार्थनास्थळ असून प्रार्थनेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना या घाणीतूनच वाट काढत जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर ड्रेनेचे काम नैसर्गिक उतारा प्रमाणे करून नागरिकांची होणाऱ्या त्रासापासून कायमची सुटका करावी. तसेच हेतुपूरस्पर हे काम करणाऱ्या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे ग्रामपंचायत वाळूजकडे करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदनावर रतन अंबिलवादे, तालूक सहसचिव इब्राहिम पटेल, विठ्ठल त्रिभुवन, सादिक शेख, अप्पा पवार, गोरखनाथ पदमे, जाफर शेख, शेख सुम्मया, गफ्फार पठाण, किसन औताडे, युसुफ शेख, शेख सुलताना, मुकुंदा आदींच्या सह्या आहेत.
……………

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *