
वाळूजमहानगर, (ता.22) – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टुडिप टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीच्या वतीने आयोजित पुल कॅम्पस डॉयव्ह साठी संभाजीनगरमधील विविध महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी प्रचंड प्रतिसाद दिला.
पुणे येथील ‘टुडिप टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीमार्फत बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील तसेच छत्रपती संभाजीनगरमधील विविध महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी पुल कॅम्पस डॉयव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हायटेक अभियांत्रिकी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (एमसीए), महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, छत्रपती शाहु महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेट स्टडीज, मत्स्योदरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी (जालना), एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय (लातुर), स्वामी विवेकानंद कॉलेज, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय (उस्मानाबाद) आदी महाविद्यालयातील एकुण 380 विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. या प्रसंगी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव व संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘टुडिप टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीमार्फत इंजि. कृष्णा दिवेदी, इंजि. शुभम यादव, इंजि. हितेश चौधरी हे अधिकारी उपस्थित होते. तसेच हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद ढगे, आणि हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभागाचे प्रा. अमोल अडकिणे, सिव्हील विभागचे प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रा. प्रताप मोहिते, प्रथम वर्षीचे विभागप्रमुख डॉ. भावना पिंगळे, ट्रेनिग अॅण्ड प्लेसमेंटस विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन भोर, सीएसईएआयएमएल विभागाचे प्रा. संदिप इंगळे व महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी.बी. जाधव यांच्यासह वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
