March 25, 2026


वाळुज महानगर, (ता.25) – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकीमहाविद्यालयामध्ये 21 जुन रोजी जागतिक योग दिनाच्या निमित्याने योगदिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या जागतिक योग दिनाचा कार्यक्रम हा भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव व सहसचिव अमन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या योग शिबीरात योगाशिक्षिका प्रा. माल्ती गंगावणे यांनी विद्यार्थी व कर्मचा-यांना विविध प्रकारच्या योग प्रात्यक्षिकाव्दारे योग प्रशिक्षण देवून योगाचे महत्व हे मनुष्याच्या शरीर व आरोग्यासाठी कशा प्रकारे महत्वाचे आहे, याबाबत माहिती दिली. तसेच आपले आरोग्य व शरीर निरोगी राहण्यासाठी योगा साधनेचा फार मोठा फायदा असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी हायटेक अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य प्रा. गोविंद एस. ढगे, हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अमोल एस. अडकिणे, सिव्हील विभागचे विभाग प्रमुख प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रताप एम. मोहिते, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. भावना पी. पिंगळे, सीएसईएआयएमएल विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदिप ई. इंगळे, ट्रेंनिग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन के. भोर, विदयार्थी परिषदेचे प्रमुख प्रा. ए. डी. येताळकर आणि महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने योग दिनात सहभाग नोंदविला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *