
वाळूजमहानगर (ता.01) – भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्था संचलित बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त रॅली काढून राष्ट्रीय एकता दिवस सोमवारी (ता.31) रोजी साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव व सहसचिव अमन जाधव यांनी राष्ट्रीय एकता सर्वानी जोपासावी. असे अवाहन त्यांनी केले.
कार्यकम प्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गोविंद एस. ढगे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. याप्रसंगी प्राचार्य गोविंद ढगे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या तर्फे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमप्रसंगी हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभाग प्रमुख प्रा.अमोल एस. अडकिणे, सिव्हील विभाग प्रमुख प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. प्रताप एम. मोहिते, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. भावना पी. पिंगळे, ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन के. भोर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. स्मिता खाजेकर यांनी केले.
