March 23, 2026


वाळुज महानगर, (ता. 6) – जागा हडप करण्याच्या उद्देशाने वाळूज महानगर परिसरातील हरित पट्ट्यावर केलेले अतिक्रमण सिडकोच्या वतीने सोमवारी (ता. 5) रोजी हटवण्यात आले. या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले.

सिडको वाळूज महानगर परिसरातील सिडकोच्या अखत्यारीत येत असलेल्या हरितपट्ट्यावर काही जणांनी अतिक्रमणे केली होती. याप्रकरणी सिडको प्रशासनाने गंभीर दखल घेत हरित पट्ट्यावर उभारलेले अतिक्रमणे, शेडनेट पेंडॉल, काढण्यास सिडको प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. हरित पट्ट्यावरील अतिक्रमणे निष्काशीत करण्याची कार्यवाही सिडको प्रशासक भागवत बिघोत यांच्या आदेशाने वसाहत अधिकारी स्वाती पाटील, कार्यालयीन सहाय्यक अधिकारी विनया बनवसे, सुरक्षा रक्षक विकास पवार, राणी त्रिभुवन यांनी केली. तसेच भविष्यात यापुढे कुणी हरित पट्ट्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर कठोरातकठोर कारवाई करण्यात येईल. असा सज्जन इशाराही सिडको प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *