वाळूजमहानगर (ता.9) :- ऑफिसमध्ये काम करीत असताना एक हजार रुपयाची चिल्लर मागीतली. ती न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता.8) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लिंबे जळगाव टोल नाक्यावर घडली.
लिंबे जळगाव येथील टोल नाक्यावर आप्पासाहेब वाखरे हे मंगळवारी (ता.8) रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ऑफिसमध्ये काम करीत असताना आरोपी राहुल चापे याने ऑफिसमध्ये घुसून एक हजार रुपयाचे कॉईन मागितले. त्यास नकार दिल्याने आरोपीने वाखरे याला शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आप्पासाहेब दगडू वाखुरे वय-34, रा.जिकठाण ता. गंगापूर यांच्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात आरोपी राहुल काकासाहेब चापे रा. वाळूज ता. गंगापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण बुट्टे करीत आहे.