March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.4 – बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवानी विद्यामंदिरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी रोजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्य फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले गेले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत गायन, भाषण केले. कार्यक्रमास अनेक विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूशेत आल्या होत्या. यावेळी नारायणी वसमतकर या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांचे जीवनपट उलगडून सांगणारी नाटिका सादर केली. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. नंदिनी लहाने यांनी आजच्या मुलींनी अधुनिकतेचि कास धरली पाहिजे असे मार्गदर्शनपर आवाहन केले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक हनुमान भोंडवे, अशोक लगड, विजय विखले, पंडित नवले, राजेंद्र माने, शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री कदम, पर्यवेक्षिका श्वेता पवार, आशा महाले,संगीता साबळे,जालिंदर लगड, ज्ञानेश्वर साळुंके, संजय साठे, हितेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका भुतडा यांनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *