
वाळूजमहानगर, (ता.4) – बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवानी विद्यामंदिरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार किशनचंद तनवानी यांच्या हस्ते ध्वज पुजन करण्यात आले. तर ध्वजारोहण संस्थेचे संचालक पंडीत नवले यांच्या हस्ते करण्यात आले.
आदर्श शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी उद्योजक हनुमान भोंडवे, विजय उखळे, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाबद्दल माहिती सांगितली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी अशोक लगड, राजेंद्र माने, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, राजश्री कदम, रामचंद्र जाधव, पर्यवेक्षक अशोक मुटकुळे, सर्व समन्व्यक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
