March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) – मानवत येथील घटनेचा व्हिडिओ स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी बजाजनगर येथील एकाला रांजणगाव (शेणपुंजी) च्या तीन जणांनी लाथा बुक्क्यांनी व लोखंडी गजाने जबर मारहाण केली. बजाजनगर येथील एका दुचाकी शोरूम समोर शुक्रवारी (ता.9) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटने प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मानवत जि. परभणी येथे दोन मुस्लिम तरुणांनी एका हिंदू तरुणीची छेड काढली होती. त्यामुळे हिंदू तरुणीसह तरुणांनी छेड काढणाऱ्याला बेदम चोप दिला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तोच व्हिडिओ बजाजनगर परिसरातील साईनगर, सिडको येथील शुभम रमेश गिरी याने सोशल मीडियाच्या स्टेटस वर ठेवला होता. आणि त्यावर कॉमेंट केली होती. त्यामुळे रांजणगाव (शेणपुंजी) येथील चौघेजण गिरी ज्या ठिकाणी काम करीत होता. त्या धनलक्ष्मी आटो येथे आले. त्यातील सोहेल करिम शेख याने तु तुझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर असा व्हिडीओ का ठेवला? असे बोलून गिरी याला हातबुक्याने मारहाण करुन व वाईट बोलुन दमदाटी केली. त्यातील आवेज रसुल शेख याने त्याच्या कमरेमध्ये लपवलेला लोखंडी रॉड शुभम गिरी याच्या डोक्यात मारला. त्यामुळे जबर जखम झाली व त्यातुन मोठे रक्त यायला लागले. म्हणून ते सर्वजण तेथुन पळुन गेले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान अशीच पोस्ट स्टेटसवर ठेवल्याने शाम दत्ता पांढरे (22 वषे) रा. दत्तनगर रांजणगांव ता. गंगापूर जि. छ. संभाजीनगर यास मारहान झाल्याने वाळुज एमआयडीसी पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन उपचारार्थ दवाखान्यात रवाना केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *