March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.1) – राखी पौर्णिमेनिमित्त श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव येथील विद्यार्थी, विद्यार्थ्यीनीनी 280 राख्या स्वतः घरी बनवून त्या मिलटरी कॅम्प छत्रपती संभाजीनगर येथील मेजर, ब्रिगेडियर व सैनिक यांना बांधून बुधवारी (ता.30) रोजी बंधुत्व जपले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे, कला शिक्षक सुरेश सुलताने, भगवान वनारसे, सविता गोसावी यांनी विद्यार्थ्या समवेत सैनिकांना राख्या बांधल्या. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन करण्यासाठी पर्यवेक्षिका सरोज पवार, वैशाली सपकाळ, रमा आडे, ज्योती भालेराव, आशा साळुंखे, अनिल भांड, सुरेश घोरबांड, शिवकुमार होनराव, संतोष बंडेवार, दादासाहेब हजारे यांनी केले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *