वाळूजमहानगर, (ता.23) – इंटर नॅशनल ऑलिंपिक डे निमित्त सोमवारी 23 जून रोजी गजानन महाराज मंदिर गारखेडा संभाजीनगर येथे वाळूज येथील विंग चुन मार्शल आर्ट च्या गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूज मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षा मुद्दा लक्षात ठेऊन सेल्फ डिफेन्स चे प्रत्याक्षिक दाखवुन उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी फेन्सिंग असोसिएशनचे सर्वेसर्वा उदय डोंगरे, जिल्हा क्रिडा कार्यालयाचे गोकुळ तांदळे, जिल्हा योग संघटनेचे सचिव सुरेश मिरकर, विस्डम इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक प्रा. कैलास जाधव, शाम अंभोरे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी, क्रिडा संघटक, क्रिडा संघ आदींची उपस्थिती होती. सेल्फ प्रात्यक्षिक टिम ला मास्टर रामेश्वर चायल यांचे मार्गदर्शन लाभले.
