
वाळूजमहानगर, (ता. 3) – सूरज सिम टेक्नो वर्क्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दीपक तोष्णीवाल आणि अमोल सारडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून रविवारी (ता.2) मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या परिसरात झालेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कामगार, कर्मचारी मिळून 44 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

जायंट्स ग्रुप ऑफ वाळूज यांच्या सहकार्याने आणि दत्ताजी भाले रक्तपेढीच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमात 44 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स ग्रुपचे कुणाल साबू, गोवर्धन बजाज, दत्ताजी भाले रक्तपेढीचे के डी कुलकर्णी आणि बद्रीविशाल तोष्णीवाल उपस्थित होते. 
यावेळी बोलताना दीपक तोष्णीवाल म्हणाले, “रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपल्या रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो, यापेक्षा मोठे समाधान दुसरे कोणतेही नाही. या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद झाला.”
सूरज सिम टेक्नो वर्क्स कंपनीच्या वतीने अमोल गुरव, शुभम गायकवाड, मोनाल सामृतवार यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व केले आणि इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान दिले.
प्रेरणादायी उपक्रम –
दीपक तोष्णीवाल आणि अमोल सारडा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. जायंट्स ग्रुप आणि दत्ताजी भाले रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.
