March 24, 2026


वाळुज महानगर, (ता.22) – साउथ सिटी, सिडको वाळूज महानगर येथील नागरीकांच्या विविध समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या. या मागणीचे निवेदन
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना 18 मे 2025 रोजी देण्यात आले. यावेळी नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने सिडको व साउथ सिटी मधील समस्या बाबत चर्चा केली.

सिडको व साउथ सिटी पाणीपुरवठा नियोजन विस्कळीत झाल्यामुळे प्रशासनाने एक दिवसाआड पाणी देण्यात यावे. त्याचप्रमाणे सिडको व साउथ सिटी उद्यानाचा त्वरित विकास करावा. त्यासाठी सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा. सिडको व साउथ सिटी स्मशानभूमीतील अंतर्गत कामे दुरुस्तीकरण व सौंदर्यकरण करावे. अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे सिडको व साउथ सिटी मधील डांबरीकरण व साऊथ सिटी मधील आमदार निधी मधील सिमेंट रोडचे काम अर्धवट झालेले ते सर्व काम पूर्ण करा, कचरा समस्या अत्यंत गंभीर आहे. त्यावर उपाययोजना करण्यात यावी. याविषयीचे निवेदन देण्यात आले. त्यावेळेस उपस्थित तुषार जाधव जिल्हा सचिव भाजपा, नारायण हातोळे, ज्ञानदेव थेटे, निकम कैलास, किशोर हिरामण, भाऊसाहेब वाकचौरे, गोपाल पाटील, संजय भंगाळे, भगवान झोपे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *