February 5, 2026
सिडको वाळूज महानगर एक मध्ये वृक्षारोपण करताना

वाळूजमहानगर – सिडकोच्या मुख्य प्रशासक दिपा मुधोळ/मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासक सोहम वायाळ यांच्या उपस्थितीत तसेच वसाहत आधिकारी अस्मिता विरशीत यांच्या पुढाकारातून 25 जुलै ते 15 आगस्टपर्यंत सिडको वाळूजमहानगर 1 तसेच 4 येथे व्रक्षलागवड करण्यात आली. या उपक्रमात कडुलिंब, अर्जुन, बहावा, जांभूळ, चिंच, आंबा, मोहगुणी, सिल्व्हर ओक, पिंपळ, वड, करंज अशी जवळजवळ एक हजार व्रक्ष लागवड करण्यात आले.

एक कुटूंब, एक झाड संवर्धन प्रोत्साहन प्रमाणपत्र देतांना सिडकोचे सोहम वायाळ, अस्मिता विरशीद, नागेश कुठारे, नरेंद्र यादव आदी.

या झाडांचे संवर्धन करण्यासाठी तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे यांनी पुढाकार घेऊन सिध्दिविनायक विहार, एन्ड्युरन्स काॅलनी, राज स्वप्नपुर्ती, आदर्श काॅलनी, म्हाडा काॅलनी, स्वप्नर्ती या काॅलनीतील सदस्य यांना एक कुटूंब, एक झाड संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सिडकोचे प्रशासक सोहम वायाळ तसेच वसाहत आधिकारी अस्मिता विरशीद, उपसरपंच नागेश कुठारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमात राज स्वप्नपुर्तीचे सुशांत चौधरी, अशोक लांडगे, सतिश शिंदे, काळुदास भगरे, मंगल शिंदे, अपर्णा जाधव, चव्हाण मनिषा, प्रमिला चौधरी, किरण गांवडे, नीता अग्रवाल, सुनीता शेळके, सुनंदा लांडगे, रामेश्वरी जाधव, माधुरी तांगडे, सायली शेषवारे, जगन्नाथ पाटील, महादेव गोरडे, विनोद डोसे, विजय कर्जतकर, राजेंद्र कणसे, रवीजीत हजारे आदी नागरिकानी झाडे दत्तक घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *