
वाळूजमहानगर, (ता.15) – जागतिक महिला दिना निमित्ताने शिवसेना छ्त्रपती संभाजीनगर पच्छिम आणि एम.जी.एम. रुग्णालय व मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.15) रोजी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात परिसरातील 475 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

सिडको वाळुज महानगर -1 येथे घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सिडकोच्या वसाहत अधिकारी अस्मिता विरशिद यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अनिता डहारिया, ऍडव्होकेट सुनीता सोनवणे, प्रा. अन्वया मगरे, विजयकुमार जाधव, संजय सेवलीकर, राजेंद्र तरटे, वैभव गायकवाड, शुभांगी देशपांडे, अर्चना विसपुते, वैशाली गायकवाड आदींची उपस्थिती होती. या शिबिरात परिसरातील 475 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
