
वाळूजमहानगर, ता.2 (बातमीदार) – सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ मुंढे यांच्या वाढ दिवसाचे निमित्त साधुन मराठवाडा – कन्नड सांस्कृतिक संघाच्या वतीने सिडको वाळूज महानगर येथे मंगळवारी (ता.27) रोजी वृक्षारोपण करण्यात आला. यावेळी मराठवाडा कन्नड संघाचे कार्यदर्शी श्रीनिवास तेलंग यांनी सगळ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी सिडकोच्या मुख्य प्रशासक मुघोळ – मुंडे यांनी समाजसेवा आणि मुलांच्या भविष्य शिक्षण बद्दल मार्गदर्शन केले. कन्नड संघाचे कार्यदर्शी श्रीनिवास तेलंग यांनी आभार मानले. यावेळी सिडको कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कन्नड संघ तर्फे केशव होणारे, श्रीनिवास तेलंग, गुरु चिंचोली, किरण कुलकर्णी, उदय कुलकर्णी, राजेंद्र चौधरी, सुरज खंडाळे, राहुल सुरेश प्रभू , श्रीमती कलावती होणारी, श्रीमती भाग्यश्री तेलंग, नागम्मा चिंचोली, विनता मैसूर मठ, श्रीमती गौरी चौधरी, श्रीमती श्रावणी कुलकर्णी, श्रीमती गीता पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
