March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.25)- सिडको वाळूज महानगर येथील सारा गौरव सोसायटी मधील एका घराला आग लागली. मात्र सुदैवाने ही आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी (ता.25) रोजी दुपारी घडली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुल देव हे कुटुंबासह सिडको वाळूज महानगर येथील सारा गौरव सोसायटी मधील घर नं. 49 मध्ये राहतात.
शुक्रवारी (ता.25) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास देव यांच्या घराला अचानक आग लागली.
या आगीची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन दलाचे आर एच घरत, के टी सुरवंशी, एस के गायकवाड, एस डी उकरे पाटील, एन एस पारके आदींनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. भरदुपारी उन्हाच्या कडाक्यात लागलेली ही आग वेळीच आटोक्यात आली. नसता मोठी हानी झाली असती. या आगीचे कारण समजू शकले नसले तरी ती देव घरात दिवा लावल्याने किंवा शॉर्ट सर्किट झाल्याने लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उन्हाचा कडाका लक्षात घेता नागरिकांनी आपापल्या घराची तसेच अन्य मालमत्तेची योग्य काळजी घेऊन आगीच्या घटना टाळाव्यात. असे आवाहन अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *