
वाळूजमहानगर, (ता.3) – वाळूज महानगरातील मुलांनी भविष्यात आयपीएल, रणजी ट्रॉफी या सारख्या स्पर्धेत खेळावे, त्यांच्या खेळण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी युनिव्हर्सल क्रिकेट अकॅडमीच्या वतीने 31 मार्च 2024 रोजी यू -12 साठी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यात विविध विभागातून 11 संघानी सहभाग नोंदवला. अंतिम सामना युनिव्हर्सल स्पार्क अकॅडमी व एच एस जे अकॅडमी या दोन संघात झाला. यात एच एस जे संघाने युनिव्हर्सल स्पार्क संघावर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी यश उगले (एच एस जे अकॅडमी) ठरला तर फायटर ऑफ द मॅचचा मानकरी कौस्तुभ दीक्षित (युनिव्हर्सल स्पार्क अकॅडमी) हा ठरला. विस्डम अकॅडमीच्या झैद खानने या स्पर्धेत 181 रन काढून 9 विकेट घेतल्या त्यामुळे तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. बेस्ट बॅट्समन पाटील अकॅडमीचा हंसिका शर्मा ठरला. त्याने 137 रान काढले. तर बेस्ट बॉलर युनिव्हर्सल स्पार्क अकॅडमीचा राम कलमेघ हा ठरला. बेस्ट विकेटसाठी पार्थ चव्हाण याला सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या संघास मानचिन्ह, क्रिकेट किट व जर्सी देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून इप्का लॅबोरेटोरीजचे व्यवस्थापक डॉ.व्यंकट मैलापुरे व जीवनज्योत हॉस्पिटलचे डॉ पंकज बालदोटा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.संदीप शेळके यांनी तर आभार संदीप जाधव यांनी मानले.
