सिडको वाळूज परिसरात विजेच्या समस्या वाढल्या, ग्राहकांची महावितरणकडे धाव
वाळूजमहानगर rknewslive – सिडको वाळूज महानगर येथील विजेच्या समस्या जटील बनल्याने येथील नागरिक त्रस्त झालेअसून सिडको वाळूजमहानगर सबस्टेशन अंतर्गत विकास कामे तसेच दैनंदिन वाढत्या समस्या सोडविण्यासाठी
तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले यांना शनिवारी (ता.19) रोजी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
तिसगाव येथील सिडको वाळुजमहानगर सबस्टेशन अंतर्गत ग्राहकांची संख्या 25 ते 28 हजार असुन तसेच दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या पहाता येथे नविन सबस्टेशनची उभारणी करणे अत्यावश्यक आहे. या सबस्टेशनवर अतिरिक्त भार असल्यामुळे विजेच्या समस्या जटील होत आहे. येथील ग्राहकांच्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी असुन आहेत. येथील धोकादायक डिस्ट्रीबुशन बाॅक्स व मिनिपिलर बदलणे आवश्यक आहे. बहुतांश डिपी असुरक्षित असुन त्यास तार कंपाऊंड नाही. देवगिरी नदी, म्हाडा काॅलनी येथे 11 केव्हीच्या विद्युत तारा लोंबकळत आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत मिटरची उपलब्धता नाही. सबस्टेशन अंतर्गत मागील पाच वर्षांत विकास कामे तसेच देखभाल दुरूस्तीची कामे झाली नाही. ए.एस.क्लब, सम्यक गार्डन, सिडको वाळूजमहानगर-2 व 4 चा भाग पाटोदाकडून काढुन बजाजनगर अथवा महावितरण ग्रामीण परिमंडळ सिडको वाळूजमहानगरला जोडण्यात यावा. तिसगाव येथिल मंजुर सबस्टेशनची उभारणी करण्यात यावी. तसेच कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे सबस्टेशन अंतर्गत सर्व परिसरात दिवसभरात सतत विद्युत पुरवठा खंडित होतो. सिडकोकडून पाणीपुरवठा सुरु केला की, नेहमीच विद्युत पुरवठा खंडित होतो. यामुळे पाणी मिळत नाही. या परिसरात क्षेत्रातील कामगार कर्मचारी तसेच सिडको वाळूजमहानगर परिसर असल्यामुळे तीन तीन पाळीत (शिफ्ट मध्ये) कामगार व कर्मचारी काम करत असतात. तसेच सबस्टेशन अंतर्गत सिडको कार्यालय ,बँक, हॉस्पिटल, कोरोना कोविड केअर सेंटर असल्यामुळे सततचा वाढता परिसर पहाता या ठिकाणी स्वतंत्र सबस्टेशनची अवश्यकता आहे. सिडको वाळुजमहानगर सबस्टेशन अंतर्गत सर्व ग्राहक नियमित वीजबिल भरत असुन या ठिकाणावरून करोडो रुपयांचा महसूल जमा होत आहे. मात्र तशी सेवा महावितरणकडून मिळत नाही. सिडको वाळुजमहानगर सबस्टेशनचा काही भाग पाटोदा सबस्टेशनला जोडण्यात आल्यापासून सतत विद्युतपुरवठा खंडित होत आहे. या सबस्टेशन अंतर्गत सिडको,म्हाडा व बिल्डर कडुन दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असून मोठमोठ्या गृहनिर्माण काॅलनी सह मोठ्या वाळुजमहानगर शहराची निर्मीती होत आहे. हा भाग शहरी होत असल्यामुळे याची जोडणी अर्बनला करून सुविधा अर्बनच्या मिळत नाही. असा आरोपही यावेळी करण्यात आला. या प्रसंगी नागेश कुठारे, राजेश कसुरे, गणेश रंगळ, कृष्णा गायकवाड, नरेंद्रसिंग यादव, सुरेश प्रभु, रेखा सुर्यवंशी, प्रविण हाडे यांची उपस्थिती होती.