February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.6) – भारतीय स्त्रियांचे अंधकारमय जीवन शिक्षणरुपी, ज्ञानरूपी, ज्योतीने प्रकाशमान करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आहे. महिलांमध्ये शिक्षणासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करून ज्ञानाच्या आकाशात उत्तुंग भरारी घेण्याची संधी सावित्रीबाईंनी महिलांना निर्माण करून दिली. म्हणूनच क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विचारांचा, ज्ञानाचा, संस्काराचा जागर करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन एकनाथ जाधव यांनी केले.


भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था संचलित राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, बजाजनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून संस्थेचे सचिव एकनाथ जाधव होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण समितीची अध्यक्ष आशा शेरखाने, गटशिक्षणाधिकारी समाधान आराक, शिक्षणविस्तार अधिकारी अनिलकुमार सखदेव, संस्थेचे सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. एस एस कादरी यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक अँड.आशा शेरखाने म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना कायदेविषयक सल्ला देऊन समाजात वावरताना काही अडचणी आल्यास आम्ही तुम्हाला मदत करू. तसेच संधीची वाट न पाहता आपण स्वतः संधी निर्माण करावी. याप्रसंगी एपीआय स्नेहा करेवाड, गटशिक्षणाधिकारी समाधान आराक आणि सुरेखा शिंदे यांनी सुद्धा विचार व्यक्त केले. याप्रसंगी माता सावित्रीबाई फुले सन्मान गौरव पुरस्कार 2023 देऊन विमल जाधव, सुरेखा शिंदे, उपसरपंच ज्योतीताई साळे, एपीआय स्नेहा करेवाड, पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित, मोनाली महालपुरे, भारती साळुंके, विद्या भोसले, चंद्रकला शर्मा, रंजना घोडके, कल्याणी सांगुले, स्वाती पटकरी, रत्नमाला कदम, रेखा डिसूजा, अर्चना जाधव, सोनल पाटील या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री शेजुळ यांनी डॉ.कादरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयुरी कुलकर्णी, माधुरी बहिरट, अनिता बोबडे, अरुणा चौधरी, नाना इंगळे, प्रकाश सोनवणे, जी एम गायके यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *