वाळूजमहानगर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर झेंडा, ग्राम स्वच्छता अभियान तसेच वृक्षारोपण असे विविध उपक्रम वर्षभर व्यवस्थित राबवल्याने सिडको वाळूज महानगर येथील सारा इलाईट या नागरी सोसायटीला “अ” दर्जा मिळाला. त्यामुळे सोसायटीच्या वतीने घेण्यात आलेल्या सातव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांचे कौतुक करत स्वागत करण्यात आले.
वाळूज महानगर -1 परिसरातील ‘सारा-इलाईट’ सोसायटीची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीचे चेअरमन योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता.25) रोजी उत्साहात झाली. यावेळी अविनाश डुंबरे, शैलेंद्र कोरे यांनी मनोगत व्यक्त करत सोसायटीच्या विविध उपक्रमा विषयी तसेच सोसायटीला मिळालेल्या “अ” दर्जाचे कौतुक केले. योगेश पाटील यांनी मागील वर्षात झालेल्या विविध कार्यक्रमांचे अध्यक्ष व आयोजक यांच्या कामांचे कौतुक करत त्यांचा सोसायटीच्या वतीने स्वागत केले. सचिव मछिंद्रनाथ कुंभार यांनी सोसायटी अहवाल वाचून दाखवला आणि सोसायटी ला ‘अ’ दर्जा मिळाल्याची माहिती दिली. सभेला उपाध्यक्ष लीलाधर साळुंखे, कोषाध्यक्ष गोपाल पाटील, सहकोषाध्यक्ष नरेंद्र धुमाळ, संचालक सुनील जायभाई, महेंद्र बोराडे, दिपक जगताप, सुहास चौबे, आनंद पाटील, हरीशचंद्र गायकवाड, अनिल अंबोरे व शशिकला अनिल चित्ते यांनीही सोसायटीचे कामकाज मांडले. बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. अविनाश डुंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.