
वाळूजमहानगर, (ता.13) – सामाजिक विचार मंचच्या परंपरे नुसार प्रत्येक महान विभूतींची जयंती साजरी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून महिला शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मंचचे संस्थापक अध्यक्ष गजानन नांदुरकर, अध्यक्ष केशव ढोले, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव सुपेकर व वनिता वडोदकर यांच्या हस्ते करून संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. 
तसेच अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होत सामाजिक विचार मंच तर्फे नानानानी पार्क परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र शेलगावकर यांनी केले तर आभार शिवाजी राऊत यांनी मानले. या उपक्रमासाठी सुकेशनी गवई, सरिता पांचाळ, आरती म्हस्के, व्यंकटेश भोरे, परमेश्वर गणाचार्य, विश्वनाथ धोंडगे, गणेश पळसकर, अमर निकम, नितीन शेळके, बटुगीर बावा, सदाशिव पाटील, बी.जी.पाटील, ज्ञानेश्वर धुर्वे, मेनिनाथ खरबडे, जयराम लोंढे, चंद्रकांत तांबवे, व्यंकटी टेकाडे, दादासाहेब घाडगे, सुर्यकांत सणस, वसंत कदम, दिलीप दबडे, दिलीप देशमुख, महेंद्र म्हस्के, बळीराम पांचाळ, प्रितम गवई, लिलाधर रोकडे आदींनी परिश्रम घेतले.
