February 5, 2026

सिडको वाळूज महानगर दोन मधील साऊथ सिटीत नियमित स्वच्छता, गार्डनची दूरवस्था, कचरा कुंडी, पथदिवे, वाहनचोरी आदी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहे. शिवाय सरपटणाऱ्या प्राण्यापासून मानवी जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या समस्या एका महिन्याच्या आत सोडवा, नसता तीव्र उपोषण करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.

सिडको वाळूज महानगर – 2 येथील साउथ सिटीतील समस्याबाबत सिडको प्रशासनास निवेदन देताना त्रस्त नागरिक..

सिडको वाळूज महानगर दोन येथे बॉटनिकल गार्डन आहे. नियमित स्वच्छता व देखरेखी अभावी या गार्डनला जंगलाचे स्वरूप आले असून येथील सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या गार्डन मधील अनावश्यक गवत काढून स्वच्छता होत नाही. तसेच मॉर्निंग वाँकसाठी पेव्हर ब्लॉक व फुटपाथ नाही. या गार्डनच्या संरक्षक भिंती जवळ गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथे सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याशिवाय परिसरात पथदिव्या अभावी सर्वत्र अंधार असतो. त्यामुळे चोऱ्यामाऱ्यासह वाहन चोरीचे प्रमाणही वाढले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे व पथदिव्यांची व्यवस्था नाही. त्याचप्रमाणे परिसरातील कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात आलेल्या नाहीत. घंटागाडी सुध्दा दररोज येण्यासाठी व्यवस्थाकेलेली नाही. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून येत्या एक महिन्याच्यात या समस्या सोडवाव्यात. नसता लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल. असा इशारा कुंदन लाटे, अशोक राऊत, पवन दाभाडे, संतोष शहाणे, कचरू जाधव, विष्णू सोळुंके, सतीश तिथे, बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर नाईकवाडे, सुदाम काळे, रामेश्वर पदमपल्ले, चत्रू पवार, सुमित शेजुळ, वाल्मीक पवार आदींनी दिला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *