March 23, 2026


वाळूजमहानगर, ता.14 (बातमीदार) -बंद असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडून आतील सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. ही चोरीची घटना शनिवारी (ता.13) रोजी उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साऊथ सिटी मधील प्लॉट नं. 179, 180 कलावती कुंज येथे राहणारे ऋषिकेश जयवंत माडगे (वय 43) हे व्यापारी असून ते 5 जानेवारीपासून लातूर येथे मूळ गावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. ते मुळगावी असतांना शेजारी राहणारे कोकीळ यांच्या लक्षात ही चोरीची घटना येतात त्यांनी फोन करून माहिती दिली. त्यामुळे मांडगे यांनी घरी येऊन पाहणी केली असता घराचे दाराचे कडीकोंडा तुटलेला दिसला. घरातील सामान अस्थाव्यस्थ पडलेले होते. घरात बेडरुम मध्ये ठेवलेले 80 हजार रुपये रोख रक्कम, अर्धा किलो वजनाचा व 20 हजार रुपये किमंतीचा चांदीचा तांब्या असा 1 लाख रुपये किमतीचा ऐवज व इतर सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ऋषिकेश मांडगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन डाके करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *