
वाळूजमहानगर, (ता.7) – सिडको वाळूज महानगर 1 तिसगाव, गट नंबर 170 मधील महावीरनगर, जिजाऊ चौक, येथील साईकृपा हाऊसिंग सोसायटीची सर्वसाधारण सभा रविवारी (ता.7) रोजी उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी बी.के.झुंजारे होते.

यावेळी अध्यक्ष- ज्ञानेश्वर म्हस्के, सचिव- चंदुलाल जावळे, कोषाध्यक्ष- बाळू कुंभार तर संचालकपदी- नारायण निकम, बाबासाहेब काळे, विजय सरोदे, दसरथसिंग हजारी, कडूबा लोंढे, गजानन मगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी भगवान हिवाळे, नितीन नेमाडे, सुरेश चव्हाण, बालाजी संगेकर, विलास जोगदंड, विपुल उपाध्याय, बाळासाहेब जाधव, प्रकाश शिंदे, बाबाजी शेलार, अनिल शिकारीलाल, गजानन पाटोळे, शांताराम राऊत, पांडुरंग गोरे, दिलीप बाविस्कर, श्रीराम सोनवणे, रामकृष्ण काळे, निलेश कोल्हे, प्रभू शिंदे, कल्याण देशमुख, भावेश पाटील, गोरे साहेब, सुरेंद्र कुलकर्णी, प्रभू भालेकर, भिला अहिरे, संदीप पाटील, नरेंद्र मराठे, दिगंबर काळे, नारायण राठोड, बाळा मानकापे, संजय भोरगे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू कुंभार यांनी तर नारायण निकम यांनी आभार मानले.
