
वाळूज महानगर, (ता.5)- गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूज, छत्रपती संभाजीनगर जिल्हा योग संघटना आणि भारतीय योग संस्थान, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी निमित्त आयोजित सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. 
यात श्री गजानन प्राथमिक विद्या मंदिर 1 ली ते 4 थी मुलांचा गट व श्री गजानन प्राथमिक विद्या मंदिर 1 ली ते 4 थी मुलींच्या गटाने बजाजनगर वाळूज विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. तर श्री गजानन माध्यमिक विद्या मंदिरच्याच 5, वी ते 9 वी मुलांचा गट व श्री गजानन माध्यमिक विद्या मंदिर 5 वी ते 9 मुलींच्या गटाने बजाजनगर वाळूज विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला.
बसवंतराव पाटील प्राथमिक इंग्लिश स्कूल 1 ली ते 4 थी मुलांचा गट बजाजनगर वाळूज विभागातून द्वितीय क्रमांक. बसवंतराव पाटील माध्यमिक इंग्लिश स्कूल 5 वी ते 9 वी मुलांचा गट बजाजनगर वाळूज विभागातून चतुर्थ क्रमांक आला. 
बसवंतराव पाटील माध्यमिक इंग्लिश स्कूल 5 वी ते 9 वी मुलींचा गट बजाजनगर वाळूज विभागातून चतुर्थ क्रमांक आला. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक आय. जी. जाधव, संस्थेचे सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक मष्णाजी शिनगारे, 
प्राथमिक उपमुख्याध्यापक शहाजी मांगनाळे, माध्यमिक विभागप्रमुख संजय तुपे, बसवंतराव पाटील प्राथमिक मुख्याध्यापिका रेखा बिदरकर, माध्यमिक मुख्याध्यापक बी .वी. शिरसाठ, कल्याण कुलकर्णी, सौरभ लगड, पुजा गिरी, विजया पवार, संदीप हिंगणकर, दीपक पठारे, दीपक कोळी, सुनील शिंदे, गुलाब मोहिते, क्रीडा शिक्षक जब्बार पठाण, राहुल दोंदे आदीनी स्वागत केले.
