
वाळूजमहानगर, (ता.13) – प्रसन्न शिक्षण संस्था संचालित सह्याद्री स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे संचालक प्रभाकर म्हस्के, अध्यक्षा निर्मला म्हस्के, मुख्याध्यापक निलेश म्हस्के व श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती.
प्रथम मुख्याध्यापक निलेश म्हस्के यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आलें. प्री स्कूल ते दहावीचे विद्यार्थी जिजामाता व स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेत आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषण, गायन, कविता सादर केल्या.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, आपल्या घरी ‘शिवबा’ जन्माला यावे,
असे प्रत्येकाला वाटते. पण शिवबा जन्माला येत नसतो, तर तो घडवावा लागतो. संस्कार, धैर्य, कर्तृत्व यांचा सुंदर मिलाप म्हणजे जिजामाता. शिवबा घडले ते फक्त आणि फक्त जिजाबाईंमुळेच. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती यादव, सुप्रिया गणगे, ज्योत्स्ना पाटील, ज्योती साळवे, मोनिका निर्मले, रत्नप्रभा पाटील, पूनम पाठक, शिल्पा पोफळी, प्रियंका गायकवाड, देबारती घोष, अभिषेक गौंड, कविता भराडे, आरती खंडागळे, रुचिका मेहेत्रे, कविता शर्मा, जया पगारे, परमेश्वर तवार, भाग्यश्री माचवे, माधवी कुलकर्णी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
