
वाळूजमहानगर, (ता.13) – सर्व दहावीचे विद्यार्थी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो सीबीएसई दहावीचा निकाल शुक्रवारी (ता.12) रोजी जाहीर झाला. यामध्ये आदर्श ग्राम पाटोदा येथील सह्याद्री स्कूल या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. अखंडित 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी कायम ठेवली.

या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेवून उत्कृष्ट यश मिळवले. यामध्ये उत्कृष्ट गुण संपादन करणारे विद्यार्थी – मानसी ढेकळे (93.60),
आदित्य आटोळे (93), वेदांत म्हस्के (91.6), प्रणय लोणकर (91), दिव्या पळसकर (90.2), भूमिका कुलकर्णी (90.2), सोहम दहातोंडे (88.8) तनिष्का लोणकर (88.8), तनिष्का गव्हाणे (88.2), ओंकार बोरसे (85.8), सायली पोटे (85.8), साक्षी सरोदे (85), अक्षरा चौधरी (84.4), स्नेहल वाघ (81.8), धनश्री सराटे (81.6), राशी गायकवाड (81.6), समृद्धी शिंदे (80.4) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के, मुख्याध्यापक निलेश म्हस्के, संचालक प्रभाकर म्हस्के यांनी स्वागत करून पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
