February 5, 2026

वाळूजमहानगर, ता.10 – वाळूज परिसरातील दिघी (काळेगाव) येथून चोरी झालेल्या दूचाकीचा शोध घेत असताना पोलिसांनी सराईत गुन्हेगारास पकडून चोरीस गेलेल्या दुचाकीसह विविध कंपनीच्या आणखी 5 अशा एकूण 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कामगिरी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी (ता.10) रोजी केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाज पल्सर दुचाकी (एमएच 20, एफई -7432) ही चोरी गेल्याबाबत सुमनबाई भानुदास साळुंके (वय 60) रा. दीघी ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे वाळुज येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे यांना माहिती मिळाली की, चोरी गेलेली पल्सर दुचाकी एका सराईत वाहन चोराने चोरून नेली. त्यामुळे त्याच्यावर सतत पाळत ठेवुन त्याच्या हालचालीची सतत माहीती घेतली. त्याच्यावर सापळा रचलेला असतांना तो लांझी रोड येथे पल्सर घेऊन आला. त्यास जागीच पकडुन पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केली असता त्याच्या ताब्यात असलेली गुन्ह्यातील दुचाकी
(एमएच 20, एफई -7432)चा नंबर बदलुन तो ती वापरत असल्याचे उघडकीस आले. सुरेश भिमा मल्ले (वय 26) रा.जेऊर ता.नेवासा जि. नगर (हमु वाळुज एम.आय.डी.सी) असे या दुचाकी चोर आरोपीचे नाव असून त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अधिक तपासात त्याच्याकडुन ठाणे शहर येथुन चोरीस गेलेली यामाहा कंपनीची आर 15 ही माहगडी दुचाकी हस्तगत केली. तसेच इतर 5 अशा एकुण 6 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

यांनी केली कामगिरी  –

ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, पो.अं. विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, अमन शेख यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *