March 23, 2026

 

स्नेहसंमेलनवाळूजमहानगर, (ता.2) – घाणेगाव येथील सरस्वती इंग्लिश स्कूल, सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘कलाविष्कार -2025’ मोठ्या उत्साहात झाले.

या कार्यक्रमात नर्सरी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी वृद्धांची व्यथा, व्यसनमुक्ती यावर नाटिका सादर केल्या. तसेच नृत्य, विविध राज्यातील संस्कृती दर्शविणारी गाणी, राष्ट्रीय एकात्मता, कुंभमेळा, नागा साधू नृत्य यासह अनेक मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वतीबाई कानिटकर, घाणेगावचे सरपंच केशव गायके, उपसरपंच सुधाकर गायके, जिल्हा परिषद सदस्य श्याम बनसोडे, पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ गायके, वंदनाताई फाळके, ज्ञानेश्वर गायके, नारायण काळवणे, संस्थेचे संचालक केशव कानिटकर, सुधाकर जवळकर, माधव कानिटकर, अलका जवळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, भोंडवे पाटील स्कूलच्या संचालिका मीनाक्षी भोंडवे, उद्योजक अनिलकुमार पूनिया, अमोल गिरमे हे होते. याप्रसंगी ओलंपियाड परीक्षेतील गुणवंत तसेच इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंतांचा पालकांसह प्रमुख सत्कार करण्यात आला. तसेच या वर्षी शाळेतील शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून गायत्री खिल्लारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन गावचे पोलीस पाटील श्यामराव फाळके यांनी गौरव पत्र देऊन पालकासह सन्मान केला. कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वीततेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा काळे, पर्यवेक्षिका प्रिया पुरीगोसावी, बरखा गोपे, रवी राजगुरू, पल्लवी शिरावाडकर, संजना भोत, धनश्री पाषाण, सुप्रिया पाठक, तुळजा गायके, पूजा जंगले, मोनाली डमाले, पूनम खंडाळकर, गंगासागर दुदमल, अशोक इंगोले, दिव्या भादवे, लक्ष्मीकांत कानीटकर, मनोज कानिटकर, राहुल जवळकर, पंकज कुलकर्णी, श्रीकांत कानेटकर, भाऊराव काळवणे, विद्याधर जवळकर, शशिकांत जवळकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल मगर यांनी केले तर आभार संचालक केशव कानिटकर यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *