February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.22) – झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील समेदशिखरजी हे जैन धर्माचे सर्वात पवित्र तीर्थस्थळ आहे. या पवित्र तिर्थक्षेत्रला झारखंड राज्य सरकार व केंद्र सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे सकल जैन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून, या तीर्थस्थळाचे पावित्र्य आबादीत राखण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ घोषित केलेला पर्यटन क्षेत्राचा कायदा रद्द करावा. या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी (ता.21) रोजी बजाजनगर येथे मूक मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले.

जैन धर्मामधील शाश्वत तीर्थधाम समेदशिखर्जी (पारसनाथ तीर्थ) ला केंद्र सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाच्या जगातील सर्व जैन समाज आणि आचार्य भगवन्त, साधु, साधवींनी निंदा केली असून, हा निर्णय तत्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी वाळुज महानगरातील सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी (ता.21) मूक मोर्चा काढून वाळूज एमआयडीसी पोलीसांना निवेदन दिले. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी सकल जैन समाजाचे अनिल चोरडिया, चंद्रकांत चोरडिया, संतोष चोरडिया, मनोज कासलीवाल, केसरीनाथ धोंगडे, इंद्रकुमार गवळी, दिलीप ढेरे, महावीर धुमाळे, गिरीश दुग्गड, मनोज कटारिया, डॉ.प्रवीण तातेड, अभिजीत बांडे, राजेंद्र मंडलेचा, सतीश छाजेड, संजीव साकला, महावीर शिंगि, किरण हनुमंते, वर्षा जैन, अतुल चुडीवाल, स्वरूपचंद बगडिया, अशोक तातेड, संतोष गुंडेचा, कुशल पाटील, मनोज संकेलचा, नीरज साकला, राजेंद्र काला, प्रणव पाटील, जालंदर गंगवाल यांच्यासह बजाजनगर, पंढरपूर, वाळूज, रांजणगाव, तुर्काबाद, आंबेलोहळ परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *