February 5, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.4) :- जामगाव येथील शरद प्रतिभा ग्रामीण विकास संस्था व संतोष माने युथ फाऊंडेशन यांच्या वतीने औरंगाबाद, येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरातील 19 माता भगिनी तसेच वयस्कर नागरिक यांची मोती बिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

या गोरगरिबांना वेळेवर मिळालेल्या या उपचारामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून नातेवाईकांचाही आनंद गगनाला भिडला होता. ग्रामीण भागातील वयस्कर माता भगिनी व वडीलधारी मंडळी एका वया नंतर स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. व परिणामी त्यांच्या शरिराला विविध अडचणींना सामोरे जावा लागते. शरद प्रतिभा ग्रामीण विकास संस्था या सर्व ज्येष्ठ नगिरांसाठी नेहमी मदतीसाठी पुढाकार घेणार आहे व त्यांची सेवा करणार असल्याचे यावेळी संतोष माने युथ फाऊंडेशनचे तथा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष माने यांनी सांगितले.
………….

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *