March 22, 2026


वाळुज महानगर, (ता 22) – संत निरंकारी मंडळाच्या बजाजनगर विभागाच्या वतीने श्री जागुत हनुमान मंदीर, बजाजनगर येथे सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत रविवारी 21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात परिसरातील 254 रक्तदात्यांनी स्फुर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या शिबीराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे चिखली शाखेचे मुखी शालिकराम चवरे, संत निरंकारी मंडळाचे जिल्हा प्रमुख डि जी दळवी यांनी केले. यावेळी संत निरंकारी मंडळाचे शाखा प्रमुख शिवाजी कुबडे तसेच घाटी रुग्णालयाच्या डॉ. सुनिता बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट, नंदकुमार घोडेले, विकास जैन, उद्योजक हनुमान भोंडवे, विजय बोडखे, सचिन आधाने यांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली. “रक्त हे रस्तावर वाहन्यापेक्षा ते मानवाच्या धमन्यांमध्ये वाहिले पाहीजे” हा संदेश निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी संपुर्ण विश्वाला दिला. त्यांच्या उक्तीनुसार दरवर्षी अशा रक्तदान शिबीराचे आयोजन संपुर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 10 वर्षांपासुन वाळुज (बजाजनगर) शाखेत अशा भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. या रक्तदान शिबीरासाठी बजाजनगर, रांणजगाव, वाळुज, वडगाव, छत्रपती संभाजीनगरहुन रक्तदाते एकत्रित झाले होते.
या रक्तदान शिबिरात घाटी रुग्णालयाच्या डॉ. शितल अठाणे, डॉ मयुरी रंगारी, डॉ सपना यादव, डॉ मेघा गंगले, डॉ श्रेया कवळे, डॉ मंजुश्री मगर, पुजा जांगिड, सिद्धांत भालेराव, बबन वाघ, अविनाश देहाडे आदीनी रक्त संकलन केले. निरंकारी मंडळाच्या वाळुज सेवादल युनिटने या रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *