
वाळूजमहानगर, (ता.23) – वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत थोर समाजसुधारक, ग्रामस्वच्छता, लोकजागृती, अंधश्रध्दा निर्मूलनाचे व्रत हाती घेतलेले संत गाडगेबाबांना त्यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता.23) रोजी अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, हरिश्चंद्र रामटेके, सचिन वाघ, अनिता राठोड, मंगल गाडेकर, सोनाली निकम, दिपाली काळबांडे, सुवर्णा शिंदे, हेमलता जाधव, रिता मार्कंडे, विद्या सोनोने, योगिता देवकाते आदींची उपस्थिती होती.
