
वाळूजमहानगर, (ता.2) :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर तसेच औरंगाबाद जिल्हा कमिटी यांनी धमकीर्ती यांची जिल्हा महासचिव पदावर निवड केली. संघटन तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे आणि संघटनेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळवून देणयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. राजणगाव सर्कल संघटक, गंगापूर तालुका अध्यक्ष पटेल, युवा अध्यक्ष नितीन शेजवळ, वैजापूर तालुकाध्यक्ष सिद्धार्थ तेझाड, खुलताबाद तालुकाध्यक्ष मुक्तार भाई, कन्नड तालुकाध्यक्ष देविदास राठोड, प्रकाश ससाने तसेच सर्व वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडी, युवा आघाडी, कार्यकर्त्यांनी धमकीर्ती यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
