March 17, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.16) – मकर संक्रातीनिमित्त वाळूज औद्योगिक वसाहती मधील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरासह बजाजनगर, वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी येथील विविध मंदिरात सुवासिनी महिलांनी वाण देण्यासाठी रविवारी (ता.15) रोजी प्रचंड गर्दी केली होती.

 

मकरसंक्रात निमित्त वाळुज महानगरातील बजाजनगर, वडगाव कोल्हाटी,तिसगाव,गोळवाडी, करोडी साजापूर, घाणेगाव,रांजणगाव शेणपुंजी, इटावा,जोगेश्वरी, वाळूज, पाटोदा, वळदगाव आदी परिसरातील मंदिरामध्ये सुवासिनींनी वान अर्पण करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

 

प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरात सकाळ पासूनच महिला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

 

यावेळी सुवासिनी महिलांनी विठुराया चरणी वान अर्पण केले. संपूर्ण मंदिर परिसर महिलांच्या महिलांच्या गर्दीने फुलून गेला होता.

यावेळी सुवासिनी महिलांनी एकमेकींचे ओटी भरत सौभाग्याचे लेन हळद-कुंकू लावत उखाणे घेतले. तसेच फुगडी खेळून महिलांनी आनंद लुटला.

यावेळी महिला भाविकांच्या दर्शनासाठी विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्टने सुंदर व्यवस्था केली होती.तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता.

 

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरा प्रमाणेच बजाजनगर, वाळूज व इतर परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिर व इतर मंदिरात महिलांची मोठी गर्दी उसळली होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *