
वाळूजमहानगर, (ता.25) – श्रीराम प्रभु यांनी सज्जनाची संघटना करून दुर्जनांचा नायनाट केला. आणि मग रामराज्य कसे आणले. यावर विस्तृत कथा सांगितली. तसेच लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी श्रीराम नामाने दगडही तरले, आयुष्य तारायचे असल्यास देहात श्वास असेपर्यंत श्रीराम नाम सोडू नका. असे उपदेशपर आवाहन बजाजनगर येथे श्रीरामकथेच्या सांगता प्रसंगी रामराव ढोक महाराज यांनी बुधवारी (ता.25) रोजी केले.
हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने बजाजनगर येथे आयोजित श्रीराम काथेच्या सांगता प्रसंगी बुधवारी (ता.25) रोजी ढोक महाराजांनी पूर्णाहुती करत रावणाचे दहन, आणि प्रभू श्रीरामांचा राजतिलक यावर विस्तृत कथा सांगत, एकमेकांचा आदर राखा, गुण्यागोविंदाने वागा. साधूंचा अपमान, निंदा कधीही करू नका. त्यांची टिंगल, टवाळी अजिबात करू नका. कारण त्यांचा मालक भगवान परमात्मा आहे. असा उपदेश उपस्थितांना केला.

या श्रीराम कथेत बुधवारी ढोक महाराजांनी बिभिषणाची भेट, रामेश्वर लिंगाची स्थापना, रामसेतू, अंगदाचा लंकेतील प्रवेश, युद्धाचा प्रसंग सांगत जशास तसे युद्ध आणि रामराज्याची स्थापना, राजतीलकाचे विश्लेषण करत रामायणातील सगळेच प्रसंग आपल्या अमृतवाणीतून उपस्थित श्रोत्यांसमोर मांडले.या प्रसंगी परभणी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, जालना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, आसाराम बोराडे, मुरलीधर शेजूळ, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, बालाप्रसाद परदेशी, संतोष कोल्हे, शिवाजी शेजूळ, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, आनंद भालेकर, प्रकाश कमलाणी,
बप्पा दळवी, राजेंद्र राठोड, सचिन गरड, कैलास भोकरे, विष्णू जाधव, विजय सरकटे, सागर शिंदे, अमोल लोहकरे, देविदास गवांदे, संदीप सदावर्ते, रामेश्वर बोंडारे, कपिंद्र पेरे, गौरव पाटील, विशाल खंडागळे, त्र्यंबक जगताप, किशोर खांड्रे, सतिष हिवाळे, करण साळे, दत्तात्रय वर्पे, गौरव खनसे, अक्षय साळुंके, श्रीकांत गाडेकर, केतन बगाडे, प्रवीण चव्हाण, दीप सौदागर, अमित देशमुख, साईनाथ वाघमारे, विलास पडघन, बापू साळुंके, दीपक सोळंके, सागर पाटील, अक्षय जाधव, प्रणव तवले, धनंजय साळुंके, संकेत वाळके, जिवेश चौधरी, स्वप्नील राठोड, गणेश औटे, माऊली भगत, मयुर लांडगे, गणेश खेडकर, विशाल पवार, शुभम रोठे, सत्यम वाळुंज, शुभम कदम, निलेश गायकवाड, कृष्णा माने, शुभम केदार, प्रज्वल शिंदे, श्रीराज तवले, ओम देशमुख, योगेश पवार, अक्षय केरे, सोमनाथ गायकवाड, वैभव गवळी, गणेश गायके, प्रफुल भोसले, प्रवीण साबळे, अनिकेत थोरात, रवी मस्के, गजानन पवार, लोकेश बारी, विशाल सौदागर, चिन्मय पाटील, वैभव ढोरे आदींची उपस्थिती होती.
चौकट – हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने बजाजनगर येथे आयोजित श्रीराम काथेस संयोजक विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सलग सातही दिवस उपस्थित राहून ढोक महाराज यांच्या अमृतवाणीतून सांगितलेल्या रामकथेचे श्रवण केले. श्रीराम कथेचे सुनियोजन, शिस्तबद्धता पाहून ढोक महाराजांनी संयोजक विरोधीपक्षनेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व आयोजक बाळासाहेब गायकवाड यांची शब्द सुमनांनी स्तुती केली.
