March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.23) – बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी या संस्थेतील बी. फार्मसी द्वितीय वर्ष आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी गुजरात औद्योगिक विकास महामंडळ, वडोदरा येथील सावली तंत्रज्ञान आणि व्यवसाय इनक्यूबेटरला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थाच्या वतीने
आयोजित केलेल्या या दोन दिवसीय शैक्षणिक दौऱ्यात दोन्ही वर्षातील 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी चार स्टाफ सदस्यांसह सक्रिय सहभाग घेतला. सावली तंत्रज्ञान आणि व्यवसाय इनक्यूबेटर सेंटरचे व्यास यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि इनक्यूबेटर केंद्रासंबंधी सर्व आवश्यक माहिती समजावून सांगितली. तसेच व्यवसाय वाढीसाठी आणि यशस्वीपणे चालविण्यासाठी इनक्यूबेशन सेंटर कसे महत्त्वाचे आहे. याचे महत्त्व देखील स्पष्ट केले. त्याशिवाय व्यास यांनी कोणतीही व्यक्ती आपल्या कल्पना कशा मांडू शकते आणि त्यांना यशस्वी स्टार्टअपकडे कसे नेऊ शकते याचे तपशीलही दिले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *