February 5, 2026

वाळूज महानगर, (ता 20) – बजाजनगर येथील भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था संचालित श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईलमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून बुधवार 15 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आला.

या कार्यक्रमाचा उद्धेश विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विचाराप्रमाणे ज्ञानप्राप्ती प्रेरणा देणे हा होता कार्यक्रमाची सुरुवात डॉ कलाम यांच्या प्रतिमेस पुषपांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ संतोष शेळके, प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव, विभाग प्रमुख डॉ. अनिता वाघ, प्रा. गीता दरेकर , प्रा. रश्मी चोथे, डॉ. मनोज ढमाळे, ग्रंथपाल अभिजित वैद्य, प्रा. समीना शेख, प्रा. रुचिता गिरी, प्रा.अंकित पालीवाल, प्रा. शुभांगी बिचेवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब पवार, साहेबराव शेळके यांनी परिश्रम घेतले.


यावेळी प्राचार्य डॉ संतोष शेळकेयांनी विद्यार्थ्याना उद्धेशून केलेल्या भाषणात डॉ कलाम यांच्या कार्याची आणि विचाराची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डॉ कलाम हे तरुणांच्या प्रगतीसाठी कायम प्रेणस्थान राहिले आहेत, त्यांचा वाचनावर असलेला भर तरुणांनी आत्मसात करावा व आपले भविष्य घडवावे आणि भावीजीवनात देशासाठी कार्य करावे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *