February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.29) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ-त्र्यंबकेश्वर, शाखा बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात प. पू. गुरुमाऊलींच्या आदेशानुसार 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन आर्मीतील मराठा लाईट इंन्फंन्ट्री या रेजिमेंट मधील अभय दशरथ कदम यांची विशेष उपस्थिती होती.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या फोटोचे पुजन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यकाळातील सिमेवरील चित्त थरारक अनुभव व देश सेवा करतानाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचं महत्व अभय दशरथ कदम यांनी सर्व सेवेकऱ्यांना मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले. झेंडा वंदन सोहळ्यानंतर सिमेवरील सैनिकांचे अध्यात्मिक शक्तीने मनोधैर्य वाढावे या उद्देशाने सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठाचे अयोजन करण्यात आले होते.

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात गुरूपीठाचे पिठाधिश प. पू. आण्णासाहेब मोरे (गुरुमाऊली) यांच्या आशीर्वादाने देशहितासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. अध्यात्मातून ऊर्जा निर्मिती, सेवेकरी संघटीत करून अनेक क्षेत्रात प. पू. गुरुमाऊलींच्या आदेशानुसार देशहितार्थ विविध क्षेत्रात कार्यक्रम राबवले जात आहेत. बालसंस्कार, युवा प्रबोधन ही काळाची गरज असुन, ही पिढी देशाची अधारस्तंभ असुन, योग्य वयात केलेले संस्कार हे चिरतरुण असतात आणि त्यातूनच खरे राष्ट्रहित साधले जाणार आहे. या उद्देशाने प्रत्येक सेवा केंद्रात बालसंस्कार व युवा प्रबोधन वर्ग घेतले जातात. तसेच देशात व राज्यात येणाऱ्या अकस्मीत संकटकाळी रेस्क्यू आँपरेशन टिम तयार करून या कार्याने बचाव कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. असे बजाजनगर केंद्राचे केंद्र प्रतिनिधी संतोष पाटील यांनी यावेळी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. कार्यक्रमास परिसरातील सेवेकऱ्यांसह बजाजनगर केंद्रातील सर्व विभागातील प्रतिनिधींची उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *