
वाळूजमहानगर, (ता.22) – विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणास्थान कै.गुलाबराव (दादा) राऊत यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम श्री.साईनाथ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (ता.21) रोजी झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विलासराव राऊत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सईदाबी पठाण, अपंग प्रहार संघटनेचे अध्यक्ष पारसचंद साकला, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र अभंग, ग्रामपंचायत सदस्य अमजदखाँ पठाण, बबनराव गायकवाड, काकासाहेब चापे, अविनाश गायकवाड, आर. के भराड, डी.पी.वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व दादांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु. अश्विनी घाटोळे, व कु. ज्योती खैरनार या विद्यार्थीनींनी सुमधुर भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविक प्राचार्य एम.पी.सुरगडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
सरपंच सईदाबी पठाण यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा गैरवापर करू नये. तसेच बबनराव गायकवाड, शरदचंद्र अभंग व काकासाहेब चापे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संज्योती रोठे यांनी केले तर आभार एस.एन. जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
