March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.5) – ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी दिवंगत भाई डॉ. केशवराव धोंडगे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे. पुं) ता. गंगापूर जि. छ. संभाजीनगर येथे विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण, गुणवंतांचा सत्कार व शर्करातुला करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रा.जे.एम.खान तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.संचालक अजीवन शिक्षण विभाग डॉ. बा. आ.विद्यापीठ संभाजीनगरचे प्रा.डॉ.जी.टी.देवगावकर उपस्थित होते.

प्रथम श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ स्वांतत्रसेनानी यांनी संस्थापक व संचालक, दिवंगत भाई डॉ. केशवराव धोंडगे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी डॉ. केशवराव धोंडगे यांचे बालपण त्यांचे शैक्षणिक कार्य, राजकीय प्रवास याविषयी सविस्तर माहिती सांगून अभिवादन केले. शालेय समिती अध्यक्ष प्रा.रविंद्र खरात यांनी साहेबांचा वक्तशीरपणा त्यांचे लवकर उठून लिखाण करणे, व्यायाम करणे. या सवयी याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.जी.टी.देवगावकर यांनी साहेबांचे अनुभव कथन करून एकनिष्ठता, एक पक्ष एक झेंडा. इतरांवर प्रेम, लिखाण, मोर्चा याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.जे.एम.खान यांनी साहेबांच्या कार्याविषयी छोटे छोटे किस्से सांगून सविस्तर माहिती दिली.

जयंतीनिमित्त शाळेत चित्रकला रांगोळी, निबंध वक्तृत्व अशा विविध स्पर्धा वेगवेगळ्या गटात घेण्यात आल्या. यात प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या वतीने बक्षीस देण्यात आले. तसेच एस.एस.सी. परिक्षा मार्च 2023 मध्ये गुणांनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांची शर्करा तुला करण्यात आली. श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खोकडपुरा संभाजीनगर येथील सेवानिवृत्त झालेले प्रा.जे.एम.खान, प्रा.बी.डी.राजपूत, डी.एन.पाटील, पी.बी.बैसाने, एस.टी.ढवळे यांचा शाळेच्या वतीने भेट वस्तू देऊन सेवागौरव करण्यात आला.

संस्थेचे संचालक जे.एम.खान यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमास शालेय समिती सदस्य केशव नंदनवनकर, सोमनाथ हिवाळे, रवी गाडेकर, पर्यवेक्षिका सरोज पवार उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीते साठी सुरेश सुलताने, भगवान वनारसे, संतोष बंडेवार, शिवकुमार होनराव, सुरेश घोरबांड, विजय परदेशी, आशा साळुंखे, सतीश जावळे, तारामती जाधव यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुण्याचा परिचय सविता गोसावी यांनी तर सेवानिवृत्त शिक्षकांचा परिचय रमा आडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका वैशाली सपकाळ, सूत्रसंचालन अनिल भांड यांनी तर आभार ज्योती भालेराव यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *